मुंबई: राज्यातील पुन्हा पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मंगळवारी सायंकाळी बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी दुपारी १ वाजता संपन्न झाली. राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी केले आहेत.
आस्तिक कुमार पांडे यांची मुंबई एमएमआरडीएच्या सहआयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर विदर्भातील राळेगावचे प्रांत असलेले विशाल खत्री यांची बदली प्रकल्पाधिकारी तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून डहाणू येथे करण्यात आली आहे.