पंढरपूर: पश्चिम बंगाल मधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने वतीने काल सोमवार, दि. २१ एप्रिल रोजी जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. तसेच पश्चिम बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्याबाबत निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये हिंदू समाजावर सातत्याने होणारे हल्ले, जाळपोळ, धार्मिक द्वेष भावना वाढविणारे प्रकार आणि शासन यंत्रणेचे अपयश हे चिंतेचे कारण बनले आहे.
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराची चौकशी राष्ट्रीय तपासणी संस्थेकडून करण्यात यावी, तसेच पश्चिम बंगाल राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी केंद्रीय सुरक्षा दलाकडे सोपविण्यात यावी आणि बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांची ओळख पटवून त्यांना परत देशाबाहेर पाठवण्यात यावे. भारत आणि बांगलादेश सीमारेषेवर तत्काल कुंपण घालण्यात काम सुरू करण्यात यावे.
वरील सर्व मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले