सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुण्याच्या व्यावसायिकाची बिहारमध्ये हत्या! बिहार पोलिस बेवारस म्हणून करणार होते अंत्यसंस्कार

जहानाबाद पोलिसांना १२ एप्रिल रोजी लक्ष्मण साधू शिंदे यांचा मृतदेह घोषी पोलिस ठाण्याच्या हद्दीत झुमकी तसेच मानपुर गावामध्ये रस्त्यावर पडलेला आढळला होता.

Sudarshan MH
  • Apr 16 2025 11:48AM
पुणे: पुण्यातील एका व्यावसायिकाची बिहाराच्या पाटण्यात अपहरण करुन हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील कोथरुड येथील व्यावसायिक लक्ष्मण साधू शिंदे (वय - ५५) यांना काही दिवसांपूर्वी कंपनीचे काही टुल्स आणि मशिनरी स्वस्तात देणार असे आमीष दाखवून ईमेलद्वारे त्यांना बिहारच्या पाटण्यात बोलावून घेतले होते. त्यामुळे लक्ष्मण शिंदे विमानाने पाटणा विमानतळावर पोहचले त्यानंतर त्यांचे अपहरण करण्यात आले. सोमवारी त्यांच्या मृतदेहाला पाटणा विमानतळ पोलिसांनी त्यांचा मृतदेह जहानाबाद जिल्ह्यातून ताब्यात घेतला.
 
जहानाबाद पोलिसांना १२ एप्रिल रोजी लक्ष्मण साधू शिंदे यांचा मृतदेह घोषी पोलिस ठाण्याच्या हद्दीत झुमकी तसेच मानपुर गावामध्ये रस्त्यावर पडलेला आढळला होता. परंतु, मृतदेहाची ओळख पटू शकली नव्हती. पोस्टमार्टेमला हा मृतदेह पाठवून दिला होता.
 
मिळालेल्या प्राथमिक माहीतीनुसार, त्यांची अपहरणकर्त्यांनी खंडणी न दिल्याने गळा दाबून हत्या केली असल्याचे उघड झाले आहे. त्यांचा मृतदेह बेवारस समजून त्यावर अंत्य संस्कार करण्याची तयारी चालू असताना पाटणा पोलिसांनी मृतदेहाची ओळख सांगितल्याने प्रक्रिया थांबवली.
 
लक्ष्मण साधू शिंदे हे पुणे येथील कोथरुडच्या एकलव्य कॉलेज जवळील इंद्रायणी को - ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी डी/०१ येथे वास्तव्य करत होते. त्यांचे साडू विशाल लवाजी लोखंडे यांच्या लेखी तक्रारीनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ते पुणे पोलिसांसोबत पाटणा येथे आले होते. पाटणा पोलिसांनी सांगितले की ११ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता शिंदे इंडिगोच्या ६ई-६५३ विमानाने पुण्याहून पाटणाला आले होते.
 
त्यानंतर त्यांनी पत्नीला फोन करुन सांगितले, की शिवराज सागी नावाच्या व्यक्तीनी गाडी पाठविली आहे. त्याच वाहनाने झारखंडमध्ये कोल इंडिया कंपनीच्या कार्यालयात जाऊ असे त्यांनी सांगितले होते. शिंदे यांची पत्नी रत्नप्रभा यांनी पोलिसांना सांगितले, की ११ एप्रिलच्या रात्री साडे नऊ वाजता पतीच्या नंबरवर कॉल केला तर त्यांचा मोबाईल बंद झाला होता. एक तासांनी मोबाईल चालू झाला आणि मिस कॉल अलर्टचा मॅसेज पाहून त्यांना पुन्हा कॉल केला. यावेळी कोणी तरी दुसऱ्या व्यक्तीने फोन उचलला आणि शिंदे बाथरुमला गेलेत, असे सांगितले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क केला असता तर फोनच बंद असल्याचे आढळले.
 
दरम्यान, दुसऱ्या दिवशी त्यांनी ही माहीती त्यांच्या भाऊजीं लोखंडे यांना दिली. त्यानंतर त्यांनी पुण्यात तक्रार दाखल केली. नालंदा येथील हिलसा येथे त्यांचे शेवटचे लोकेशन दिसत होते. पाटणा येथील आसपासच्या पोलिस ठाण्यांना शिंदे यांचे फोटो पाठविण्यात आले.त्यानंतर जहानाबाद पोलिसांनी संपर्क केल्याने हा प्रकार उघडकीस आला. सायबर भामट्यांनी शिंदे यांना स्वस्तात मशिनरी देतो सांगून त्यांचा पैशासाठी खून केल्याचा संशय आहे.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार