मुंबई: जम्मू - काश्मीरमधील पहलगाममधील पर्यटनस्थळावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यात तब्बल २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही पुण्यातील असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अतुल मोने आणि दिलीप दिसले या दोघांचा मृत्यू झाला आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.
पुण्यातील पर्यटक जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं फिरण्यासाठी गेले होते. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. तर काही पर्यटक जखमी झाले आहेत. पुण्यातील आसावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे, संगीता गनबोटे हे पर्यटक पहलगाममध्ये होते. यावेळी संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांनाही गोळी लागली आहे. हे कुटुंब मुळचे बारामती तालुक्यातील असून सध्या पुण्यात कर्वेनगरमध्ये वेदान्त नगरीजवळ राहात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.