Sudarshan Ghule Confession: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी क्रूर हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात कृष्णा आंधळे हा फरार आहे. तर इतर आरोपी कारागृहात आहे. काल या प्रकरणाची पहिली सुनावणी बीड जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. प्रकरणातील एक आरोपी सुदर्शन घुले याने त्यांचा खून केल्याचा कबुली जबाब दिला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्याशी अवादा कंपनीच्या टॉवर प्रकरणात आरोपींशी वाद उद्भवला होता. गावातील कंपनीच्या टॉवरवरील कामगाराला आरोपींनी मारहाण केली होती. त्यावेळी संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केला होता. त्यावरून सुदर्शन घुले, विष्णू चाटे यांच्यासोबत देशमुख यांचा पहिला वाद झाला. त्यानंतर आरोपींनी ६ डिसेंबरपासून त्यांची हत्या करण्याचा घाट घातला. या सर्व प्रकरणात वाल्मिक कराड हाच मार्गदर्शन करत असल्याचा युक्तीवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला.
तर या प्रकरणात आता माणुसकीला काळिमा फासणारा आरोपी सुदर्शन घुले याने खुनाची कबुली दिली आहे. संतोष देशमुख यांचे अपहरण केले आणि त्यानंतर त्यांचा खून केल्याची कबुली सुदर्शन घुले याने दिली आहे. यामुळे आता याप्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे.