सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून खून करण्यासाठी शंभर रुपयांची सुपारी! शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर गुन्हा दाखल

शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sudarshan MH
  • Jan 29 2025 10:00AM

दौंड: विद्यार्थ्याने पालकाची खोटी स्वाक्षरी केल्याची माहिती विद्यार्थिनीने वर्गशिक्षकांना दिली. याचा राग मनात धरून विद्यार्थ्याने त्या विद्यार्थिनीचा बलात्कार करून मारून टाकण्यासाठी शंभर रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हे प्रकरण लपविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षिका आणि नववीच्या वर्गशिक्षकाविरोधात दौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दौंडमधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थिनीची सुपारी देण्याचा गंभीर प्रकार घडला. मात्र, शाळेची बदनामी टाळण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक वर्गशिक्षिका आणि वर्गशिक्षक यांनी गंभीर प्रकार लपवून ठेवत दुर्लक्ष केले. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, दौंड शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या १२ वर्षीय विद्यार्थिनीनं पालकांसह पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सुपारी देण्यात आल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांतील तक्रारीनुसार, विद्यार्थिनीने तिच्या वर्गातील विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याची माहिती वर्गशिक्षिकेला दिली होती. त्याचा राग मनात धरून त्या विद्यार्थ्याने आणि त्याच्या मित्राने इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला १०० रुपयांची सुपारी दिली. पीडित विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करून तिला मारून टाकण्यासाठी ही सुपारी दिली. हा प्रकार दिनांक २२ नोव्हेंबर २०२४ रोजी घडला होता. मात्र, त्या विद्यार्थ्याने याबाबतची माहिती पीडितेला दिली. पीडितेने तिच्या घरी ही माहिती दिल्यानंतर त्यांना धक्का बसला. पीडितेच्या वडिलांनी वर्गशिक्षक, सुपर वायझरसह मुख्याध्यापकांकडे याबाबत विचारणा करण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नसल्याने दौंड पोलिसांकडे धाव घेतली.

पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी महिला सहायक पोलिस निरीक्षकांना चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीदरम्यान मुख्याध्यापकांनी पीडितेवर घाणेरडे आरोप केले. पीडितेनेच १०० रुपये दिले होते. पीडित ही विद्यार्थ्यांची बदनामी करत असल्याचं तीन विद्यार्थ्यांसह एका वर्गशिक्षकाकडून लेखी जबाब घेण्यात आले होते. तसेच, मुलीनेच विद्यार्थ्याला १०० रुपये दिल्याचेही मुख्याध्यपकांनी सांगितले. याप्रकरणी मुख्याध्यापकांनी मुलीला दुसऱ्या शाळेत टाका, असे पालकांना सुचविले. हे गंभीर प्रकरण लपविण्यासाठी आणि शाळेची बदनामी टाळण्यासाठी मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांनी कटकारस्थान करून दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. पीडितेचे मानसिक आणि शैक्षणिक नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत २५ जानेवारी रोजी दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाबाबत दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार म्हणाले, पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणं आवश्यक आहे. असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहोत."

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार