सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

म्हातोबा टेकडीवरील झाडे जगविण्यात यश; आ. चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आनंद

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोथरूडमधील म्हातोबा टेकडीवर लावलेल्या झाडांना आग लावून नष्ट करण्याचा प्रकार घडला होता.

Sudarshan MH
  • Jan 31 2025 9:35AM

पुणे: कोथरूडमधील म्हातोबा टेकडीवर लावलेल्या झाडांना आग लावून नष्ट करण्याचा प्रकार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात झाला होता. या प्रकारामुळे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील संतप्त झाले होते. आता ही झाडे वाचविण्यात चंद्रकांतदादा पाटील यांच्या टीमला यश आले असून, त्यासाठी अनेक हातांच्या कष्टाचे चीज झाले असल्याची भावना आ. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. 

वृक्ष संवर्धनासाठी नामदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या १० जून २०२४ रोजी ६५ व्या वाढदिवसानिमित्त ६५ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला होता. त्यानुसार कोथरूड येथील, महात्मा, म्हातोबा, पाषाण भागातील टेकड्यांवर वृक्ष लागवड करण्यात आली होती. त्यापैकी म्हातोबा टेकडीवर ६५०० औषधी वनस्पतींसह पर्यावरण संवर्धनात अतिशय महत्वाचे ठरणारे वृक्ष लावण्यात आले. त्याच्या संवर्धनासाठी विशेष व्यवस्था देखील केली आहे. यामध्ये टेकडीवरील झाडांना पाण्याचे पाईप, टाक्या, खते, वृक्ष संवर्धनासाठी आवश्यक बाबींची व्यवस्था करण्यात आली. तसेच, त्यांच्या देखरेखीसाठी सात जणांची नेमणूक केली होती.
 
मात्र काही टवाळखोरांनी आग लावून ही झाडे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या आगीची २५०० झाडांना झळ बसली होती. त्यामुळे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील देखील संतप्त झाले होते. या घटनेनंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन टवाळखोरांवर चाप बसविण्याचे निर्देश दिले होते. दुसरीकडे झळ बसलेल्या झाडांना जगविण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेऊन काम देखील सुरु केले आहे.
 
त्यासाठी आठ जणांच्या टीमची नेमणूक केली होती. वनविभाग आणि टेकडीवर येणारे सामान्य कोथरुडकर यांच्या मदतीने अथक प्रयत्न केले. त्यामुळे या झाडांना पुन्हा एकदा पालवी फुटली आहे. त्यामुळे ही झाडे जगाविण्यासाठी केलेल्या कष्टाचे चीज झाल्यामुळे एक वेगळाच आनंद होत असल्याची भावना आ. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार