मुंबई: महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी महत्वाचे वक्तव्य केले. तसेच माध्यमांनी यासंदर्भातील बातम्या देतांना खबरदारी घेण्याचे सांगितले. पुण्यात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, की गृहमंत्री म्हणून सांगतो, पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात कृपया चुकीच्या बातम्या करु नका. माध्यमांनी १०७ नागरिक हरवले असल्याच्या बातम्या केल्या आहेत. परंतु राज्यातील एकही पाकिस्तानी नागरिक हरवले नाही. सर्वच पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. आता एकही पाकिस्तान नागरिक महाराष्ट्रात राहणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.
पुणे महानगरपालिकेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याविषयी ‘पुणे अर्बन डायलॉग’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.