पुणे: हडपसर भागातून १३ लाखांचे मॅफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी जिहादी मोहम्मद नवाब मोहम्मद अख्तर शाह (वय ३३, रा. लक्ष्मी कॉलोनी, सोलापूर रस्ता, पुणे) याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ मार्चला गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक आणि इतर पोलीस कर्मचारी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार सय्यद साहील शेख यांना आपल्या गुप्त बातमीदाराकडून आरोपी शाह याच्याबद्दल माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १३ लाख १७ हजार ५०० रूपयांचे ५८ ग्रॅम मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ तसेच इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.