जागतिक स्तरावर योग संशोधनासाठी केंद्र, सरकारने केली 15.30 कोटी रुपयांची गुंतवणूक...
केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव
जागतिक स्तरावर योग अभ्यासाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनातुन आयुष मंत्रालय यांनी शैक्षणिक संस्था, संशोधन केंद्रे आणि वेलनेस हब यांच्या सोबत 15.30 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहीती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.
भारतीय पारंपारीक योग साधनेला जागतिक स्तरावर विशेषस्थान मिळवुन देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने प्रयत्न केल्या जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जात आहे. जागतिकस्तरावर योग अभ्यासाला प्रोत्साहन मिळावे या दृष्टीकोनातुन आयुष मंत्रालयाच्या वतीने विशेष अभियान राबविल्या जात जाणर असुन त्यासाठी. 15.30 कोटी रुपयांचीही तरतुदही करण्यात आली आहे. या अभियानाच्या माध्यमातुन योग साधनेविषयी अभ्यासाला चालना मिळणार आहे. त्या दृष्टीकोनातुन केंद्रीय आयुष मंत्रालयाने शैक्षणिक संस्था, संशोधन केंद्रे आणि वेलनेस हब यांच्यासोबत योगावरील संशोधन प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीकोनातुन ही गुंतवणूक केली आहे. त्यामुळे जगभरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होणार असुन शिक्षणामध्येही योगाचे भविष्य घडविणाऱ्या परीवर्तनीय अभ्यासाचा मार्ग मोकळा होणार आहे असा विश्वास केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला आहे.