राज्यात पुन्हा महायुती सत्तेत आल्यावर एक वर्षात महाराष्ट्र - गोवा महामार्ग तयार होईल - गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत
महाराष्ट्र ते गोवा दरम्यानचा महामार्ग रस्ता मध्ये काही कंत्राटदार चांगले मिळाले नाही तसेच महाराष्ट्र मध्ये मध्यंतरी सरकार बदलले गेल्याने हा रस्ता निर्माण करण्यात अडचणी निर्माण झाल्या. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आता याबाबत पुढाकार घेतला असून राज्यात पुन्हा महायुती सत्तेत आल्यावर एक वर्षात हा मार्ग पूर्ण होईल असे मत गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.