बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरुद्ध चाळीसगाव येथे सह्याद्री प्रतिष्ठानचे आंदोलन*
बांगलादेश मधील हिंदू समाज व साधुसंतांवर तेथील नागरिकांकडून सतत अत्याचार व अन्याय होत असून याचा अतिरेक होत असल्याने त्या विरोधात चाळीसगाव येथे दि.8 डिसेंबर रोजी सह्याद्री प्रतिष्ठानने संस्थापक अध्यक्ष श्रमीक चंद्रशेखर गोजमगुंडे यांचे नेतृत्वात असहकार आंदोलन करून जाहीर निषेध तसेच करून बांगलादेशामधील हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराबाबत केंद्र सरकारने दखल घेऊन तेथील हिंदूंना सुरक्षा संरक्षण मिळेल यासाठी त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दिनांक ८ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता हे आंदोलन करण्यात आले