प्रस्तावित नवीन रेल्वे टिकीट खिडकी करू नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार: हिंदु सेवा सहाय्य समिती
नंदुरबार : नंदुरबार रेल्वे स्टेशनवर प्लेट फ्रॉम क्रमांक तीनचा पलीकडे नवीन टिकीट खिडकी बनविणे प्रस्तावित आहे. त्याठिकाणी तिकीट काढण्यासाठी पटेलवाडी, बादशहा नगर असे कॉलनी परिसरातून येण्यास प्रवाशांना त्रास होईल म्हणून प्रस्तावित नवीन रेल्वे टिकीट खिडकी त्याठिकाणी करू नये तसे करण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या आशयाचे निवेदन हिंदु सेवा सहाय्य समिती आणि नागरिकांनी वरीष्ठ मंडल अभियंता यांना सिनियर सेक्शन इंजिनिअर राजेश रंजन यांचा मार्फत दिले.