सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे

Donation

पुणे विद्यापीठातील वसतिगृह समस्यानबाबत आंदोलन .

मागील काही दिवसांपासून सातत्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतीगृहामध्ये अंमली पदार्थ सापडत आहेत. वसतीगृहातील विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, वसतीगृहामध्ये स्वच्छता नाही, वसतीगृहातील विद्यार्थ्यांना सातत्याने सरपटणारे प्राणी उपद्रव करत आहेत, वसतीगृह कार्यालयातील कर्मचारी विद्यार्थ्यांशी उद्धट भाषेत, उर्मट भाषेत बोलत आहेत, याचाच अर्थ असा की विद्यापीठाचे सध्याचे प्रभारी वसतीगृह प्रमुख हे अकार्यक्षम आहेत. विद्यार्थ्यांच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या ऐकून घेण्यासाठी त्यांना सोडवण्यासाठी ते तत्पर नाहीत म्हणूनच आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतीगृह कार्यालयात वसतीगृहाला पूर्णवेळ वसतीगृह प्रमुख मिळण्यासाठी आंदोलन केले

Boost News

Rs. 0

Boost News Position in Website
ALL Category Price Per Day