जळगाव येथे अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; बेकरी अन्न पदार्थांचा मोठा साठा जप्त.
जळगाव, दि. 12 जळगाव जिल्हयात सुरु असलेल्या ख्रिसमस व नवीन वर्ष-2025 आगमनानिमित्त विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने बेकरी तपासणी मोहीम तीव्र केलेली आहे. ग्राहकांच्या वाढत्या मागणीनुसार केक व खादयपदार्थांची विक्री सुरु आहे.