बीजेपीची ऐतिहासिक विजय: चंद्रशेखर बावनकुले यांच्या ‘पंचतत्व’ रणनीतीचा प्रभाव
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (बीजेपी) जोरदार विजय मिळवत आपली राजकीय ताकद सिद्ध केली आहे. या यशामागे पक्षाच्या कुशल रणनीतीबरोबरच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले यांच्या नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. ओबीसी समाजाचे नेतृत्व करत, बावनकुले यांनी ‘पंचतत्व’ रणनीतीच्या माध्यमातून भाजपच्या विजयाचा पाया रचला.