क्रांतीविरांचे शिरोमणी चंद्रशेखर आझाद
हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी’ या क्रांतीकारी संघटनेचे नेतृत्व स्वीकारल्यावर चंद्रशेखर आझाद यांनी अनेक तरुणांना सशस्त्र क्रांतीकार्याकडे वळवले. त्यांनी ‘काकोरी कट’, ‘साँडर्स वध’, केंद्रीय विधीमंडळातील बाँबफेक असे कट सिद्धीस नेले. इंग्रजांच्या गराड्यात सापडलेल्या या क्रांतीसूर्याने अखेरीस स्वतःवर गोळी झाडून ‘आझाद’ हे नाव सार्थ ठरवले.