सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बांगलादेशी महिलांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याच्या प्रकरणासंदर्भात कणकवलीतील लक्ष्मी लॉजच्या मालकाला पोलीस कोठडी

१५ जानेवारीला कणकवली शहरात २ बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या पोलीस कोठडीचा कालावधी २३ जानेवारीला संपला.

Sudarshan MH
  • Jan 24 2025 1:14PM
कणकवली: कणकवली शहरात पकडलेल्या बांगलादेशी महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी कणकवली एस. टी. बस स्थानकासमोरील लक्ष्मी लॉजचा मालक संजय सुरेश सांडव यांना २३ जानेवारीला येथील न्यायालयाने २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. १५ जानेवारीला कणकवली शहरात २ बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या पोलीस कोठडीचा कालावधी २३ जानेवारीला संपला. त्यामुळे पोलिसांनी दोघींना न्यायालयात उपस्थित केले असता, न्यायालयाने दोघींना न्यायालयीन कोठडी सुनावली.
 
या प्रकरणात शहरातील एका लॉजमध्ये त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर लक्ष्मी लॉजचे व्यवस्थापक ओंकार विजय भावे यांना पोलिसांनी २२ जानेवारीला अटक केली होती, तर या लॉजचे मालक सांडव यांना २३ जानेवारीला अटक करण्यात आली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार