बीड: खंडणी प्ररकणातील आरोपी आणि धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराडच्या रिमांडवर आता केज न्यायालयाऐवजी बीड जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. एसआयटीचे अधिकारी वाल्मीक कराडला घेऊन कोर्टात दाखल झाले असून थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे.
आरोपी वाल्मीक कराडला न्यायलयाच्या मागच्या दारातून एसआयटीची टीमने न्यायालयात दाखल केले. आता थोड्याच वेळात याप्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे. यामुळे सध्या न्यायालय परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.