मुंबई: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे. आता या योजनेबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दक्षिण मुंबईतील काही बांगलादेशी महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ५ बांगलादेशी नागरिकांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशी महिलांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून कामाठीपुरा परिसरात ५ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. मुंबईत बांगलादेशी महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे येथील अटकेच्या घटनेतून उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून बांगलादेशी महिलांनी खरंच या योजनेचा लाभ घेतला आहे का? किती महिलांनी योजनेचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक केली आहे? यासंदर्भात मुंबई गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे.