सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लाच घेण्यासाठी पहाटे २ वाजता उठून गेला शरद पाटील; २० हजार घेताच महसूल सहाय्यक रंगेहाथ एसीबीने पकडला

भराडी येथील पेट्रोल पंपावर तडजोड अंती २० हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यक पाटील याला एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले.

Sudarshan MH
  • Jan 26 2025 8:33AM

छत्रपती संभाजीनगर: वाळू तस्करीसाठी ट्रॅक्टर चालकाकडून
वीस हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. शरद दयाराम पाटील (४०, वर्ष रा. बजरंग चौक, छत्रपती संभाजीनगर) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई भराडी येथील एका पेट्रोल पंपावर काल, शनिवारी पहाटे २ वाजता करण्यात आली. उपळी गावाजवळील अंजना नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी करण्यात येते. येथून बिनदिक्कत अवैध वाळू वाहतूक करू देण्यासाठी सिल्लोड तहसील येथील महसूल सहाय्यक शरद पाटील याने एका ट्रॅक्टर चालकाला २५ हजारांची लाच (महिन्याचा हप्ता) मागितली. तडजोडी अंती २० हजार लाच देण्याचे ठरले. मात्र, हप्ता द्यायचा नसल्याने ट्रॅक्टर चालकाने लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली.

एसीबीने तक्रारीची पडताळणी करून शनिवारी पहाटे सापळा लावला. भराडी येथील पेट्रोल पंपावर तडजोड अंती २० हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यक पाटील याला एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात शनिवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक मुकुंद अघाव, पोलीस उपअधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक केशव दिंडे, सहाय्यक सापळा अधिकारी विजय वगरे, पोहकॉ अशोक नागरगोजे, राजेंद्र सिनकर यांच्या पथकाने केली.

दीड वर्षांत चार कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात...
सिल्लोड तालुक्यात वाळूतस्करी वाढली आहे. गेल्या दीड वर्षांत सिल्लोड तहसिल कार्यालयातील एक पेशकार, एक तलाठी, एक कोतवाल असे तीन कर्मचारी वाळूचा हप्ता घेताना लाच लुचपत विभागाने पकडले गेले. मात्र तरीही लाचखोरी कमी झाली नाही. शनिवारी पहाटे पुन्हा एका कर्मचाऱ्याला एसीबीने रंगेहाथ पकडल्याने हा आकडा आता चारवर गेला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार