सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पूरग्रस्तांसाठी लायन्स इंटरनॅशनलच्या वतीने दहा हजार डॉलरची मदत

भांडे, धान्य व कपडे, छत्री सह अठरा वस्तूंचा समावेश असलेल्या लायन्स सहायता किट वाटपाचा शुभारंभ मनपा आयुक्त डॉ. डोईफोडे आणि लायन्स प्रांतपाल गिरीश सिसोदिया यांच्या हस्ते नलागुटाचाळ इथे करण्यात आला.

Sudarshan MH
  • Sep 10 2024 3:58PM
नांदेड: नांदेड येथे पूरग्रस्तांसाठी लायन्स इंटरनॅशनलच्या वतीने दहा हजार डॉलरची मदत करण्यात आली. धन्य, भांडे ,कपडे, छत्रीसह 18 वस्तूचा या किटमध्ये समावेश आहे. या किटचे वाटप नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर डोईफोडे व लॉयन्स प्रांत पाल गिरीश सिसोदिया यांच्या हस्ते करण्यात आले.
 
प्रास्ताविक करताना रवी कडगे यांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासंदर्भात लायन्स परिवाराची भूमिका विशद केली. डॉ. डोईफोडे यांनी आपल्या भाषणातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या लायन्स परिवाराचे कौतुक केले. लायन्स प्रांतपाल सिसोदिया यांनी लायन्स तर्फे घेण्यात येणाऱ्या विविध सेवा प्रकल्पाची सविस्तर माहिती यावेळी दिली. अश्विन बाजेरिया व राहुल औसेकर यांची समायोचित भाषणे झाली. प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते २५ पूरग्रस्तांना लायन्स सहायता किटचे वितरण करण्यात आले.

 

याप्रसंगी लायन्स क्लब नांदेडच्या मिड टाऊन वतीने तयार करण्यात आलेल्या राम रक्षा किटचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. रयत रुग्णालयात रुग्णांना लायन्सचा डबा व रयत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कृपाछत्र उपक्रमांतर्गत छत्र्या वाटप करण्यात आल्या.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार