माजिद मेमन यांचं वक्तव्य वैयक्तिक; रा.कॉ. च स्पष्टीकरण
खासदार माजिद मेमन यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंआहे. “सुशांत जिंवत असताना जेवढा प्रकाशझोतात नव्हता तेवढा तो मरणोत्तर आला आहे
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एकीकडे सीबीआय तपास सुरु आहे. तर दुसरीकडे सुशांतच्या जवळील व्यक्ती रोज त्याच्याशी निगडीत गोष्टींचा खुलासा करताना दिसत आहेत. रोज एक नवा अध्याय सुशांत केसचा समोर येतो आहे. दरम्यान यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार माजिद मेमन यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. “सुशांत जिंवत असताना जेवढा प्रकाशझोतात नव्हता तेवढा तो मरणोत्तर आला आहे,” असं ते म्हणाले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्टीकरण देत त्यांच्या वक्तव्याचा पक्षाशी संबंध नसून त्यांचं वैयक्तिक मत होतं असं सांगण्यात आलं आहे.ट्विटरवर मजिद मेमन यांनी केलेले वक्तव्य हे राष्ट्रवादीचे नव्हे तर त्यांचं वैयक्तिक मत आहे. आमचा पक्ष कोणत्याही स्वरूपाने किंवा पद्धतीने त्यांच्या विधानास पाठिंबा देत नाही किंवा समर्थन देत नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे,” असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प