दिल्ली: शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी १२ मार्च रोजी दिवशी लोकसभेत बोलतांना छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे. सभागृहाच्या शून्य प्रहरात म्हस्के यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. ते म्हणाले, “भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या एकूण ३,६९१ स्मारके व कबरींपैकी २५ टक्के वास्तू या मुघल व ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नावाने उभारलेल्या आहेत. या लोकांनी भारत देश, या देशाची संस्कृती व परंपरेविरोधात कामं केली होती. औरंगजेबाची कबर ही त्यापैकी एक आहे.”
खासदार म्हस्के यावेळी म्हणाले, की भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या एकूण ३ सहस्र ६९१ स्मारके आणि कबरी यांपैकी २५ टक्के वास्तू या मोगल अन् ब्रिटीश अधिकारी यांच्या नावाने उभारलेल्या आहेत. या लोकांनी भारत देश, या देशाची संस्कृती आणि परंपरा याविरोधात कामे केली होती. औरंगजेबाची कबर त्यांपैकी एक आहे. क्रूर औरंगजेबाची कबर संरक्षित करण्याची आवश्यकताच काय ? औरंगजेबासह भारताविरोधात कामे केलेल्या सर्वांची स्मारके आणि कबरी नष्ट करायला हव्यात.