मालवण: गोहत्या थांबवण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जायला तयार आहे. आम्ही गोमातेचे भक्त आहोत, तरी २५ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता चिपळूणमध्ये मोठ्या संख्येने गर्जना सभेच्या निमित्ताने एकत्र यावे, असे आवाहन आ. निलेश राणे यांनी केले.
निलेश राणे म्हणाले, की चिपळूण तालुक्यात काल रात्री २२ गुरे एका गाडीत सापडली. हिंदू बांधवांना संशय आल्याने त्यांनी त्या गाडीचा पाठलाग केला. त्यांना गाडीतील गुरे जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. संतप्त जमावाने पोलिसांना घटनास्थळी बोलावले. पोलिसांनी कारवाई सुरू केली, परंतु अद्याप गुन्हा नोंद झाला नाही. ज्यांची गाडी आहे त्यांची नावं इकबाल आणि रुजवान अशी समोर आली आहे. यांच्यावर आधीही तस्करीचे गुन्हे नोंद आहे. ते जामिनावर बाहेर आहेत, अशी माहिती आहे. यापूर्वी घडलेल्या अनेक अशाच प्रकारच्या घटनांमध्ये हे सहभागी होते.
आम्ही पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आहे, याप्रकरणी कडक कारवाई झाली पाहिजे अन्यथा कायदा हातात घ्यावा लागेल. या पार्श्वभूमीवर २५ जानेवारीला संध्याकाळी ५ वाजता चिपळूणमध्ये मोठ्या संख्येने गर्जना सभेच्या निमित्ताने एकत्र यायचे आहे. जे काही सुरू आहे ते थांबलेच पाहिजे, ही गर्जना या सभेत केली जाणार आहे. यात जे कोणी सहभागी आहे त्यांना कायद्याची भीती आहे की नाही? हे सर्व या सभेत मांडणार आहे. अधिवेशनात हा मुद्दा मांडणार. यांच्यावर मोक्का कायदा लागू व्हावा, ही भूमिका राहणार असल्याचे आ. निलेश राणे यांनी स्पष्ट केले.