सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नेरूळ येथे हिंदुत्ववाद्यांच्या विरोधानंतर पोलिसांनी आयोजित केलेली इफ्तार मेजवानी रद्द; विश्‍व हिंदू परिषदेकडून पोलिसांना निषेध पत्र

नेरूळ पोलीस ठाणे आणि मरकज - ए - फलाह यांच्या संयुक्त विद्यमाने इफ्तार मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते.

Sudarshan MH
  • Mar 21 2025 8:29AM

मुंबई: नेरूळ पोलीस ठाणे आणि मरकज - ए - फलाह यांच्या संयुक्त विद्यमाने १८ मार्च रोजी नेरूळ पूर्वमध्ये इफ्तार मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. याविषयीच्या कार्यक्रमाची पत्रिका मरकज - ए - फलाह या धार्मिक संघटनेच्या नावे आणि नेरूळ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकार्‍याची स्वाक्षरी आणि लोगो यांच्यासहित प्रसारित झाली होती; पण कार्यक्रमाला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केल्याने कायदा - सुव्यवस्थेचे कारण देत मेजवानीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

पोलिसांनी कार्यक्रम आयोजित केल्याचे लक्षात आल्यावर विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नेरूळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यांनी नागपूर येथे झालेली दंगल आणि पोलिसांवर करण्यात आलेले प्राणघातक आक्रमण या पार्श्‍वभूमीवर कार्यक्रमाला विरोध केला. याविषयीचे पत्रही परिषदेच्या वतीने नेरूळ पोलिसांना देण्यात आले, याची नोंद घेत इफ्तार मेजवानी रद्द करण्यात आली.

एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नायकवाडी यांच्याशी संपर्क साधला; मात्र त्यांनी याविषयी बोलणे टाळले. मेजवानीच्या पत्रकामध्ये वापरण्यात आलेला ‘लोगो’ बेकायदेशीर होता, अशी माहिती अधिवक्ता आकाश जगताप यांनी दिली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार