पुणे: छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच्या काळात संताजी घोरपडे यांनी आपले कौशल्य दाखवत औरंगजेबाच्या विरोधात लढा दिला. त्याच्या साडेतीन लाखांच्या छावणीत ४०० ते ५०० मावळ्यांसह शिरून त्यांनी मुख्य तंबूचा कळस हिसकावून मोगल सैन्याला मराठा सैन्याची शक्ती दाखवून दिली होती.
त्यांचा दुर्लक्षित पराक्रम पुढील पिढीला समजण्यासाठी संताजी घोरपडे यांचे गाव असलेल्या भाळवणी खानापूर, सांगली येथे आणि मालोजी घोरपडे यांनी युद्ध कौशल्य दाखवलेल्या कारखेव, संगमेश्वर येथे त्यांचे स्मारक निर्माण केले जाणार आहे, अशी माहिती लेखक आणि ‘छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच्या काळातील मराठा सरदार आणि औरंगजेब’ या विषयाचे अभ्यासक, माजी भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी ११ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.