सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

छत्रपती संभाजीनगर व धाराशिव वर शिक्कामोर्तब! सर्वोच्च न्यायालयात ठरलं

नामांतराची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली...

Sudarshan MH
  • Aug 3 2024 8:19AM

छत्रपती संभाजीनगर: सर्वोच्च न्यायालयाने छत्रपती संभाजीनगरआणि धाराशिव नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने अशी टिप्पणी केली की नामांतरानंतर शहराचे किंवा रेल्वे स्टेशनचे नाव बदलल्यावर नेहमीच काही लोक समर्थनार्थ आणि काही विरोधात असणार आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. यामुळे आता छत्रपती महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन्ही शहरांचे ही नावे आता अधिकृत नावे ही झाली आहेत.

नामांतराच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की, नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्याने दिला आहे. न्यायालयाने असेही निरीक्षण केले की, नामांतरामुळे काही लोक समर्थनार्थ असतील तर काही विरोधात. या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले. याचिकर्त्यांचे वकील एस. बी. तळेकर यांनी न्यायालयात मांडले की, जेव्हा नाव बदलले जाते तेव्हा पूर्वी सूचना आणि हरकती मागवण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली जाते. परंतु औरंगाबाद प्रकरणी असे घडलेले नाही. त्यांनी १९९५ साली उस्मानाबाद आणि औरंगाबादचे नाव बदलले गेले होते तेव्हा सुप्रीम कोर्टाने याचिकांवर सुनावणी घेतली होती, असेही नमूद केले. महाराष्ट्रातील नामांतर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, अलाहाबाद आणि औरंगाबाद प्रकरण सारखे नाहीत आणि नामांतराच्या बाबतीत कायद्यानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे, न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार