खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा डिझेल माफियांना दणका...
चाकण : खेड तालुक्यातील निघोजे गावच्या हद्दीत गट नंबर-२६० मधील पार्किंगमध्ये बेकायदेशीर डिझेल टाकीमध्ये साठवून विना परवाना मशीनद्वारे मिसळून ते कंटेनरमध्ये भरताना मिळून आल्याने आणि कोणतीही सुरक्षा प्रणाली वापरली नसल्याचेही निदर्शनास आल्याने एकूण ९ आरोपीवर विविध कलमांच्या अनुषंगाने महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा डिझेल माफियांना दणका...
चाकण : खेड तालुक्यातील निघोजे गावच्या हद्दीत गट नंबर-२६० मधील पार्किंगमध्ये बेकायदेशीर डिझेल टाकीमध्ये साठवून विना परवाना मशीनद्वारे मिसळून ते कंटेनरमध्ये भरताना मिळून आल्याने आणि कोणतीही सुरक्षा प्रणाली वापरली नसल्याचेही निदर्शनास आल्याने एकूण ९ आरोपीवर विविध कलमांच्या अनुषंगाने महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, २२ ते २४ नोव्हेंबर २०२४ च्या दरम्यान निघोजे गावच्या हद्दीतील जमीन गट नंबर २६० मध्ये डिझेल टाकीमध्ये साठवणूक विना परवाना मशीनद्वारे एकूण ३६ कंटेनरमध्ये टँकरमधील डिझेल मोटारीच्या सहाय्याने प्लास्टिक टाकीमध्ये मिसळून ते कंटेनरमध्ये भरताना आरोपी मिळून आले. असे बेकायदेशीर काम करताना आरोपीनीं त्याठिकाणी कोणतीही अग्नीसुरक्षा यंत्रणा जागेवर तयार ठेवली नसल्याचेही फिर्यादी तहसीलदार यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सुरक्षेची काळजी न घेतल्यामुळे त्या ठिकाणी मोठा स्फोट होऊ शकला असता. त्यामुळे शेजारील MIDC मधील कंपन्यामध्ये मोठा स्फोट घडू शकला असता. आरोपीच्या या बेकायदेशीर कामामुळे त्या परिसरात मोठी जीवितहानी, पर्यावरणाची हानी व लगतच्या विविध कंपन्यामध्ये स्फोट होऊन आग लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. या कारवाईत ३६०० लिटर डिझेल, २ टँकर तसेच ३६ कंटेनर, ४ कॉम्प्युटर, १ होंडा कंपनीचे जनरेटर, ३००० लिटरची प्लस्टिक टाकी व इतर महत्वाचे साहित्य मिळून आले आहे.
आरोपीच्या या चुकीच्या कृत्याबद्दल व बेकायदेशीर डिझेल भेसळीमुळे स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका व पर्यावरनाला धोका निर्माण झाला होता. यामुळे आरोपी अमित बम व त्याचा मॅनेजर सत्यप्रकाश यादव, दिनेश नवानी, रमेश किसन इंगोले, मनेश मनोहर जागडे, प्रभूनाथ राजभर यांच्यासह जमीन मालक गणपत कचरू बेंडाले, सतीश कचरू बेंडाले, सिद्धार्थ सुनिल बेंडाले व इतर संबंधित जागा मालक यांनी जागा भाड्याने देवून संगणमत करून निघोजे गावच्या हद्दीत गट नंबर २६० मध्ये डिझेल टाकीमध्ये बेकायदेशीर साठवून विक्री केल्या प्रकरणी वरील सर्व आरोपीवर भारतीय न्याय संहिता(बीएनएस) २०२३ कलम २८७ व कलम २८८ तसेच विस्फोटक पदार्थ प्रकरणी अनाधिकृत साठा केल्याने विस्फोटक कायदा १९०८ चे कलम ३ व ४(ब) व ६ नुसार तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ मधील कलम ३ व ७ नुसार तसेच पेट्रोलियम कायदा १९३४ कलम २३ पोट कलम १(अ), मोटार स्पिरिट अँड हायस्पीड डिझेल (रेग्युलेशन अँड सप्लाय डिट्रीब्युशेन प्रिव्हेशन ऑफ मालप्रॅक्टिसेस) ऑर्डर २००५ कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात स्वतः खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केल्याने कुठे तरी या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याची चर्चा रंगू लागली आहे. आरोपीवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी तहसीलदार यांनी पंचनामा करून स्वतः आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे हे करत आहेत. या प्रकरणात इतका मोठा डिझेल साठा जप्त केल्याने यांची संपूर्ण तालूकाभर चर्चा होत आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प