पुणे: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेईपर्यंत भारत गप्प बसणार नाही. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हे सांगितले. यावेळी या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. अजित पवार म्हणाले, की महाराष्ट्रातील अनेक लोकं पर्यटनासाठी तिथे गेले होते. या हल्ल्यात काही लोकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेचा बदला कधी घेतला जाईल याची संपूर्ण देश वाट पाहत आहे, टाइट फॉर टॅट असे उत्तर कधी दिले जाईल, या सर्व गोष्टींचा विचार केला जात आहे.
तसेच, जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी आम्ही काम करत आहोत. स्वत: एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन तेथे उपस्थित आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत.
भारत गप्प बसणार नाही.