अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीनंतर तिचा भाऊ शोविकची (Shauvik Chakraborty) चौकशी करण्यात आली. सलग दुसऱ्या दिवशी ईडीनं चौकशीसाठी बोलवलं असून तब्बल 18 तास त्याची चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 7 ऑगस्टला ईडीनं रिया चक्रवर्तीची (Rhea Chakraborty)तब्बल 8 तास 30 मिनिटं चौकशी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार शोविकच्या केलेल्या चौकशीत काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यावेळी सुशांतच्या बॅंक अकाउंटमधून शोविकच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेल्या रकमेबाबत चौकशी करण्यात आली.
सुशांतच्या बॅंक अकाउंटमधून शौविकच्या अकाउंटमध्ये अनेक वेळा पैसे ट्रान्फर करण्यात आले होते. एवढेच नाही तर दोन्ही कंपनी जिथे शोविक आणि रिया संचालक होते, त्याबाबतची चौकशी करण्यात आली. यावेळी शोविक चक्रवर्तीला ईडीने युरोप दौऱ्याबाबतही विचारले, यातून काही धक्कादायक माहिती समोर आली. शोविकनंतर ईडीकडून आता रिया चक्रवर्तीचे वडील इंद्रजीच चक्रवर्ती यांची चौकशी केली जाणार आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ईडीकडून मनी लाँड्रिंगच्या अँगलने ईडीकडून तपास केला जात आहे. शुक्रवारी रिया चक्रवर्तीची ईडीकडून चौकशी करण्यात आली. तब्बल 8 तास ही चौकशी सुरू होती. सूत्रांनुसार शुक्रवारी रियाने अशी माहिती दिली की तिच्या नावावर 3 कंपनी देखील आहेत.
रियाने उत्तर देणे टाळले
याआधी रियाची चौकशी करण्यात आली. या चौकशीत न्यूज18 च्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रियाचे बँक स्टेटमेंट, इनकम टॅक्स रिटर्न, उत्पन्नाचे साधन आणि बचत यासंदर्भात तिची चौकशी झाली. मात्र जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरे 'मला माहित नाही' किंवा 'मला कसं तरी होत आहे', अशी दिली आहेत. त्याचबरोबर शुक्रवारी सुशांतची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी हिची देखील चौकशी झाली. या प्रकरणी रियाच्या भावाची शनिवारी चौकशी करण्यात आली. तब्बल 18 तास ईडीकडून ही चौकशी सुरू होती अशी माहिती मिळाली आहे.