सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

देव, देश आणि धर्मरक्षणासाठी एकत्र येण्याची शिवरायांची शिकवण; शौर्य दिनी मुख्यमंत्र्यांनी जागवल्या मराठ्यांच्या शौर्यगाथा

मराठ्यांच्या रक्ताने पावन ही भूमी आहे, पानिपतच्या युद्धातून 'एक हैं, तो सेफ हैं' हे शिकावे लागेल," असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Sudarshan MH
  • Jan 15 2025 10:14AM

दिल्ली: ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी भगव्या झेंड्याखाली आम्हाला एकत्रित आणले, त्याचप्रमाणे आज भगवा झेंडा आणि तिरंगा यांच्याखाली एकत्रित येणे ही काळाची आवश्यकता आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते १४ जानेवारी या दिवशी पानिपत येथे ‘२६४ व्या शौर्य दिवस समारंभा’त उपस्थित होते. त्यांनी ‘पानिपत शौर्य स्मारका’स भेट दिली.

हजारो किलोमीटर दुरून येऊन मराठयांनी पानीपतच्या भूमीत आपले शौर्य दाखवले होते. अटक ते कटक असे साम्राज्य असलेल्या मराठ्यांनी भारतीय संस्कृतीला जगाच्या पाठीवर मोठे करण्याचे काम केले. मराठे देशासाठी लढले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच पानिपतच्या लढाईत लढलेल्या सर्व योद्ध्यांचेही स्मरण केले आणि पानिपतचे युद्ध मराठ्यांनी पूर्ण ताकदीने लढले. मराठ्यांच्या रक्ताने पावन ही भूमी आहे, पानिपतच्या युद्धातून 'एक हैं, तो सेफ हैं' हे शिकावे लागेल," असेही मुख्यमंत्री म्हणाले. पानिपत येथे तयार होणारे शौर्य स्मारक भव्य असेल आणि यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा असेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

 
मराठ्यांनी लढलेल्या पानीपत युद्धाला १४ जानेवारी २०२५ ला २६४ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने शौर्य स्मारक समितीतर्फे पानीपत युद्धात आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या योद्ध्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पानीपतमधील शौर्य स्मारक समितीच्या कामाचे कौतुकही त्यांनी केले. दरम्यान, या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, राज्यातील मंत्री जयकुमार रावल, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खा. राजाभाऊ वाझे, खा. भास्कर भगरे उपस्थित होते. सोबतच स्थानिक नेते, पदाधिकारी तसेच आयोजक आणि शौर्य स्मारक समिती अध्यक्ष प्रदीप पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र आणि हरियाणासह उत्तर भारतातील विविध राज्यांमधील लोक उपस्थित होते. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी महाराष्ट्रातील अमरावतीचे डॉ. नितीन धांडे यांना २०२५ चा शौर्य सन्मान प्रदान करण्यात आला.
 
देवेंद्र फडणवीस यांनी जबरदस्त भाषण करत उपस्थितांची मने जिंकली आणि युद्धासह पानिपतच्या इतिहासावर प्रकाश टाकला. फडणवीस म्हणाले की, पानिपतच्या या ऐतिहासिक भूमीवर आलो, हे सौभाग्य आहे. सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली पानिपतचे युद्ध लढले गेले. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाचा इतिहास बदलला. देव- देश- धर्मासाठी लढण्याची शपथ शिवाजी महाराजांची शपथ होती. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनीही असामान्य कार्य केले. देशाला, इथल्या संस्कृतीला आणि सामान्य लोकांना वाचवण्यासाठी शिवाजी महाराजांनी कार्य केले. जिथे मंदिर, धार्मिक स्थळ उद्ध्वस्त करण्यात आले तिथेच अटक ते कटक साम्राज्य मराठ्यांनी निर्माण केले. पानिपतच्या युद्धानंतर १० वर्षांनी महादजी शिंदे यांनी दिल्लीचे तख्त मिळवले. त्यामुळे मराठे युद्ध नव्हे तर केवळ मोहीम हरले, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार