सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नागपूरात चार चाकी गाडीचा अपघात; 4 जण जखमी, ड्रायव्हर अल्पवयीन असल्याची चर्चा

या अपघातात 4 जण जखमी झाले आहेत. ज्यामधील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Shruti Patil
  • Jun 16 2024 8:16AM

नागपूर: नागपूर शहरात परत एकदा हीट अँड रन प्रकरणाची घटना समोर आली.  यात एक भरधाव कार  रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात थेट घुसली. यामुळे परिसरातील अनेक वाहनाचे नुकसान झाले असून काही जण यात जखमीही झालेय.
यामुळे परिसरातील अनेक वाहनाचे नुकसान झाले असून अनेक जण यात जखमी झाल्याची माहितीही पुढे आली आहे. हा अपघात नागपुराच्या केडीके कॉलेज रोडवर एका भरधाव कार यू टर्न घेताना रस्त्याच्याकडेला असलेल्या भाजीपाल्याच्या दुकानात शिरली. प्रथमिक माहिती नुसार या अपघातात 4 जण जखमी झाले आहेत. ज्यामधील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

चालक हा अल्पवयीन असल्याचे बोलल्या जात आहे परंतु पोलिस प्रशासना तर्फे अजूनही कुठलाच खुलासा करण्यात आलेला नाही.

नंदनवन च्या एका गॅरेजमध्ये ही गाडी दुरुस्तीला आल्याचे कळले असून गाडीवर झालेल्या कामानंतर टेस्ट ड्राइविंग साठी गॅरेजच्या कर्मचाऱ्याने ही गाडी रस्त्यावर काढली. केडीके कॉलेजच्या समोरील भरधाव रस्त्यावर वळण घेताना गाडीचा बॅलन्स बिघडला आणि अपघात झाल्याचे पुढे आले आहे. जखमींवर उपचाराची जबाबदारी गॅरेज मालकाने घेतली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार