सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पहिल्यांदा समज द्या, दुसर्‍यांदा उल्लंघन केल्यास मशिदींवरील भोंगे जप्त करा - मुंबई उच्च न्यायालय

मशिदींवरील भोंग्यांच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे.

Sudarshan MH
  • Jan 25 2025 9:18AM

मुंबई: मशिदींवरील भोंग्यांच्या आवाजाच्या विरोधात तक्रार आल्यास पोलिसांनी त्याची नोंद घ्यावी. पहिल्यांदा समज द्या आणि जर दुसर्‍यांदा उल्लंघन केले, तर भोंगे जप्त करा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. प्रार्थनेसाठी किंवा धार्मिक प्रवचनासाठी भोंगे वापरणे, हा कोणत्याही धर्माचा अत्यावश्यक भाग नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने २३ जानेवारीला सांगितले. त्यामुळे ‘ध्वनीप्रदूषण नियम, २०००’ची काटेकोर कार्यवाही करण्याचे आणि कोणत्याही धार्मिक स्थळाकडून ध्वनीप्रदूषण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.

 
मुंबईतील कुर्ला आणि चुनाभट्टी भागांतील २ रहिवासी कल्याणकारी संघटनांनी  दाखल केलेल्या याचिकेवर हा महत्त्वपूर्ण आदेश देण्यात आला आहे. याचिकेद्वारे संघटनांच्या परिसरातील अनेक मशिदी आणि मदरसे यांमुळे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाच्या संदर्भात शहर पोलिसांची उदासीनता अधोरेखित करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता.

 

खंडपिठाने नमूद केले आहे की, संबंधित निकषांमध्ये ध्वनीप्रदूषण करणार्‍यांवर प्रतिदिन ५ सहस्र रुपये दंडाचे प्रावधान आहे. ३६५ दिवस मशिदींमुळे ध्वनीप्रदूषण झाल्यास ते १८ लाख २५ सहस्र रुपये असेल.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार