सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अकोल्यातील मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू, जय मालोकरच्या मृत्यू प्रकरणाला आता नवं वळण

या प्रकरणाची सीबीआयच्या माध्यमातून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी कुटूंबियांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे. कुटूंबियांच्या जीवाला धोका असल्याची भिती मालोकार कुटूंबियांनी व्यक्त केली आहे.

Sudarshan MH
  • Sep 18 2024 7:17PM

अकोला: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांमधील एक असलेल्या जय मालोकरच्या मृत्यू प्रकरणातील खळबळजनक माहिती समोर आली आहे. जय मालोकर या तरुणाचा मृत्यू हा हृदय विकाराच्या झटक्याने नाही, तर मारहाणीमुळे झाल्याची माहिती पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आली आहे.

अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकर याचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने नाही, तर मारहाणीमुळे झाल्याची माहिती आता पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर मनसे कार्यकर्ता जय मालोकर याला मारहाण झाली होती. या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आली आहे. विशेष म्हणजे जय मालोकरचा मृत्यू झाला त्यावेळी त्याला हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाल्याचा दावा केला जात होता. पण तो दावा खोटा होता का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. तसेच जय मालोकर याचा मारहाणीमुळे मृत्यू झाला असेल तर त्याला मारहाण कोणी केली? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे.

मनसे कार्यकर्ता जय मालोकर याच्या मृत्यू प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. जय मालोकर याचा पोस्टमार्टम रिपोर्ट आता समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये जय मालोकर याचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झाल्याचा म्हटलं आहे. जय मालोकरच्या पाठीवर, छातीवर, डोक्यावर आणि मानेवर जबर मारहाण झाल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. जयला मारहाण इतकी भयानक करण्यात आली होती, की जय मालोकर याच्या छातीच्या चार ते पाच बरगड्या मागच्या बाजूने फ्रॅक्चर होत्या. तसेच डोक्याला देखील गंभीर मारहाण झाली आहे. पोस्टमार्टमवेळी जयच्या मेंदूला सूज होती, त्यामुळे त्याच्या मेंदूचं वजन वाढलं. मानेवर जबर मारहाणीमुळे त्याच्या मज्जातंतूंना गंभीर इजा झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. या घटनेमुळे न्युरोजेनिक शॉकमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं अहवालात म्हटलं आहे.

 
जयच्या मृत्यूनंतर मनसे राज ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरेंनी अकोल्यात त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. राडा झाल्यानंतरच्या तीन तासांत जयसोबत नेमकं काय झालं होतं?, याची चौकशी करण्याची जयच्या कुटूंबियांनी मागणी केली होती. या प्रकरणाची सीबीआयच्या माध्यमातून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी कुटूंबियांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे. कुटूंबियांच्या जीवाला धोका असल्याची भिती मालोकार कुटूंबियांनी व्यक्त केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार