सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

'मी साकारणार माझा बाप्पा': इकोफ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळा

गेल्या चार वर्षांपासून महाकाल प्रतिष्ठान व संभाजीनगर प्लॉगर्सतर्फे इकोफ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते.

Sudarshan MH
  • Sep 1 2024 2:29PM

छत्रपती संभाजीनगर: महाकाल प्रतिष्ठान आणि संभाजीनगर प्लॉगर्स यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी तापडिया ईनोवेशन शाळेत 'मी साकारणार माझा बाप्पा' इकोफ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. 

या शिबिरात २५० पेक्षा अधिक सदस्यांनी सहभाग नोंदवत ३०० किलो शाडू मातीपासुन गणपती बाप्पाच्या तब्बल २०० मूर्त्या तयार केल्या. लहान मुले व तरुणांनी बनवलेली मूर्ती ते आपल्या घरी स्थापना करणार आहेत.

गेल्या चार वर्षांपासून महाकाल प्रतिष्ठान व संभाजीनगर प्लॉगर्सतर्फे इकोफ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृती व्हावी, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. शाडू माती, जुने वर्तमानपत्र, पाण्याची बाटली, कपडे, टूथपिक, मूर्ती ठेवण्यासाठी कार्डबोर्ड असे साहित्य देऊन मुलांकडून गणेश मूर्ती तयार करून घेण्यात आल्या. इम्प्रेशन प्रोडक्शनचे मोलाचे सहकार्य या उपक्रमाला लाभले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार