सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुसद - वाशिम मार्गावरील सत्तरमाळ घाटात भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी

वाशिम मार्गावरील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सतरमाळ घाटात भीषण अपघात झाला आहे.

Sudarshan MH
  • Oct 7 2024 9:57AM
पुसद: वाशिम मार्गावरील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सतरमाळ घाटात माहूर येथे दर्शनासाठी जात असताना टॉयोटा चार चाकी वाहनाचा झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात जवळपास दोघाजणांचा जागिचा मृत्यू झाला आहे. तर, साहजण गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुसद वाशिम मार्गावरील सत्तर माळ घाटात नगर येथून टॉयोटा चार चाकी वाहनाने आठ प्रवासी प्रवास करत होते ते वाशिम मार्गे पुसद कडे येत असताना चालकाला अचानक झोप लागल्याने हे चार चाकी वाहन सागाच्या झाडावर आदळून भीषण अपघात झाला आहे या वाहनात जवळपास आठ जण असल्याची माहिती असून यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला असून आहे तर साहजण गंभीर जखमी असल्याची प्रथम दर्शनी माहिती आहे.
 
अपघात इतका भीषण होता, की या वाहनाचा चकनाचूर झाला. हा अपघात होऊन जवळपास दीड दोन तास अपघातग्रस्तांना मदत न मिळाल्याने हे अपघात ग्रस्त तडफडत होते त्यावेळी स्थानिकांनी घटनेची माहिती कळताच घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी घटनास्थळी खंडाळा पोलीस दाखल झाले असून अपघातग्रस्तांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती प्रथमदर्शनी सूत्रांनी दिली आहे.
 
- किरण मुक्कावार (पुसद)...

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार