सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

इयत्ता १० वी व १२ वी च्या परीक्षेसाठी बुरखा बंदी लागू करा; आमदार नितेश राणे यांची शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना मागणी

हा फक्त सुरक्षेचा आणि पारदर्शकतेचा विषय आसल्याचे मंत्री नितेश राणे यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

Sudarshan MH
  • Jan 29 2025 7:48PM

मुंबई: राज्यातील इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थिनींनी बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश करू नये, यासाठी भाजप आमदार नितेश राणे यांनी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना पत्र लिहिले आहे. परीक्षेतील पारदर्शकता आणि सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय त्वरित लागू करावा, अशी त्यांची मागणी आहे.

मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या पत्रात स्पष्ट नमूद केले आहे की, परीक्षा हॉलमध्ये बुरखा परिधान करून येणाऱ्या विद्यार्थिनींच्या तपासणीमध्ये अडचणी येतात. त्यामुळे ओळख पटवणे कठीण होते आणि गैरप्रकार होण्याची शक्यता वाढते. यामुळे राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने निर्णय घेऊन बुरखा घालून परीक्षा केंद्रात येण्यास बंदी घालावी, अशी त्यांची ठाम भूमिका आहे. "ही परीक्षा आहे, धार्मिक कार्यक्रम नाही! परीक्षेतील पारदर्शकता आणि सुरक्षेसाठी हे पाऊल उचलणे गरजेचे आहे." त्यांच्या मते, या मुद्द्याला धार्मिक रंग देण्याचे कारण नाही, हा फक्त सुरक्षेचा आणि पारदर्शकतेचा विषय आसल्याचे मंत्री नितेश राणे यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

या मागणीवर शिक्षणमंत्री दादाजी भुसे लवकरच निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. सरकार या मागणीला मंजुरी देईल का? याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार