नाशिक: भारतीय लष्करामार्फत शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल ब्रांचच्या ६४ व्या अधिकारी प्रशिक्षण तुकडीसाठीची अंतिम गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. त्यात नाशिकच्या ओम चव्हाणके याने स्थान मिळविले आहे. ओम चव्हाणके यांच्या यशाबद्दल सुदर्शन न्यूज चॅनलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश चव्हाणके यांनी ओमचे अभिनंदन केले आहे. या भरीव कामगिरीबद्दल ओमचे त्यांनी कौतुक केले आहे. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा संदेशही दिला आहे.
ओम अकरावीपासूनचं एनडीए परीक्षा आणि मुलाखतीची तयारी करत होता. मात्र त्यात त्याला यश आले नाही. बारावीनंतरही ओमनी जिद्दीने तयारी सुरु ठेवली. आणि शेवटी त्याच्या ध्येयाला त्यांनी गवसणी घातली.ओम चव्हाणके हा स्थापत्य शाखेतून अभियांत्रिकी पदवीधारक आहे. त्याचे वडील संजय चव्हाणके हे थायसन कृप कंपनीत गुणवत्ता नियंत्रण अधिकारी असून आई सुवर्णा या गृहिणी आहेत. ओमला मोटरसायकल, कॅम्पिंग, गिर्यारोहण व पुस्तके वाचण्याची आवड आहे. अंतिम गुणवत्ता यादीत त्याने ४३ वा क्रमांक मिळवला आहे. त्याने सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखत पंजाबमधील जालंधर केंद्रातून उत्तीर्ण केली होती. ओम एप्रिल महिन्यात ११ महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी गयास्थित अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीत दाखल होणार आहे. आणि प्रशिक्षण पूर्ण होताच भारतीय लष्करात लेफ्टनंट बनून कारकीर्द सुरु करेल.
लष्करात अधिकारी होणाऱ्या ओमचे यश हे सर्वचं शिकत असणाऱ्या तरुणांसाठी आणि तरुणांसाठी प्रेरणादायक ठरणार आहे. जिद्द चिकाटी आणि मेहनतीने हे यश ओमने मिळवले आहे. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच ओम चव्हाणके सोबत नाशिकच्या तेजस रायते यानेही या पदावर जागा मिळवली आहे. त्याचेही कौतुक सर्वत्र होत आहे.