श्रीरामपूर: श्रीरामपूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनेच्या सतर्कतेमुळे दिपक बर्डे खून प्रकरणातील आरोपींचा नातेवाईक असलेल्या जिहादी आमिर शेख याच्यावर अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो, व्हिडीओ काढून, व्हायरल करायची धमकी देऊन, लव्ह जिहादमध्ये अडकवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दीपक बर्डे हा हिंदू मुलगा होता. त्याने एका वर्षापूर्वी मुस्लिम मुलीशी प्रेम विवाह केल्यामुळे त्याला पुण्यातून पकडून त्याची निर्घृण हत्या जिहाद्यांनी केली होती. त्याचा मृतदेह अद्यापही सापडलेला नाही आहे. श्रीरामपूर शहराजवळील एका हॉटेलमध्ये दि. ११ एप्रिल २०२५ रोजी दुपारी एक जिहादी एका अल्पवयीन मुलीला सोबत घेऊन बसल्याचे माहिती हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. सदरील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अल्पवयीन मुलगी परिचित असल्याने त्यांनी तिच्या पालकांना जाऊन सदरील माहिती सांगितली.
दरम्यान, मुलीच्या आईने ताबडतोब त्या हॉटेलमध्ये जाऊन बघितले असता, त्यांची अल्पवयीन मुलगी जिहादी आमिर अजीज शेख (रा. भोकर, ता - श्रीरामपूर) याच्या बरोबर हॉटेलमध्ये बसल्याची दिसली. या अगोदर देखील माझ्या मुलीबरोबर सदरील आरोपीने ती दलित व अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेऊन, आरोपीने माझ्या मुलीचे अश्लील फोटो, व्हिडीओ काढून तिची बदनामी सदरील शेख नामक आरोपी करत होता, त्यामुळे मी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात दि. ४ जानेवारी २०२५ रोजी तक्रार दिली होती, त्यानुसार पोलिसांनी सदरील आरोपीला ताब्यात देखील घेतले होते, परंतु नातेवाईकांच्या सांगण्यावरून त्याच्या जामीन अर्जावर मी हरकत न घेतल्याने आरोपी आमिर तेव्हा बाहेर आला असल्याचे अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलेले आहे.
हॉटेलमध्ये दि. ११ एप्रिल २०२५ रोजी मी गेल्यावर माझी मुलगी आमिर शेख याच्याबरोबर बसल्याचे मला दिसली, तेव्हा मी तिला विश्वासात घेऊन विचारले असता, माझ्या मुलीने मला सांगितले, की आमिरने मला धमकी देऊन सांगितले आहे, की माझ्याकडे तुझे जुने फोटो आहेत, ते मी व्हायरल करेल, असे बोलून त्याने मला हॉटेलमध्ये घेऊन आल्याचे सांगितले. तसेच माझी अल्पवयीन मुलगी अनुसूचित जातीची असल्याचे माहित असून देखील, आरोपी आमिर शेख यांने माझ्या मुलीला फसवल्याचे मुलीच्या आईने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून, श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात जिहादी आरोपी आमिर शेख विरोधात भान्यासं कलम ७४, १३७ (२), ३५२, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षक अधिनियम कलम ८ व अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ०३९६/२०२५ नुसार गुन्ह्याची नोंद करून आरोपी आमिर शेख यास ताब्यात घेतले आहे.
सध्या महाराष्ट्रभर लव्ह जिहाद, बळजबरीने धर्मांतरांबद्दल, चर्चा असतांना देखील लव्ह जिहाद सारखे प्रकार थांबत नसल्याने सकल हिंदू समाजात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सरकार फक्त निवडणुकांच्या वेळीचं लव्ह जिहाद प्रतिबंधात्मक कायदा आणू, धर्मांतरण प्रतिबंधात्मक कायदा आणू, असे सांगते परंतु रोज अशा हिंदू कित्येक मुली लव्ह जिहाद, धर्मांतराला बळी पडत असतांना देखील सरकार याविरुद्ध काहीही पाऊल उचलत नसल्याने, सकल हिंदू समाज संतप्त झाल्याचे दिसत आहे. फक्त हिंदूंच्या नावावर मते मागतात, परंतु तेचं हिंदू खरचं समाजामध्ये सुरक्षित आहेत का? असे प्रश्न संतप्त सकल हिंदू समाजाकडून पुढे येत आहे.