गोर बंजारा तीर्थक्षेत्र ज्ञानपीठ लोधीवली येथे हरित क्रांतीेचे प्रनेते,आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार,स्थानिक स्वराज्य संस्था चे जनक,सिडको निर्मिते,जायकवाडी,उजनी धरण प्रकल्प निर्माते,राज्याचे मा मुखमंत्री *महानायक वसंतराव नाईक साहेब* यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय बंजारा परिषदचे महासचिव तथा भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड.पंडीतभाऊ राठोड व सौ.अलंक्रीतताई राठोड यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण - विद्यार्थी गुण गौरव - सांस्कृतिक कृषी दिन साजरा करून विविध कार्यक्रम संपन्न झाले.
एक झाड आईच्या नावाने लावा आणि त्याचे सांभाळ करण्याचे आवाहन ॲड. पंडीतभाऊ राठोड यांनी समाज बांधवांना केले आहे. गोर बंजारा तीर्थक्षेत्र ज्ञानपीठ लोधीवली येथे 1 जुलै वसंत महोत्सवाचे झाले शुभारंभ झाले. 1जुलै ते 31 जुलै महाराष्ट्र भर तांडा वस्ती मध्ये वसंत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रम होणार आसल्याची माहिती प्रदेश प्रवक्ता अमोल पवार यांनी दिली आहे.