अकोला: अकोल्यात जलसंकट आले आहे. चक्क अकोल्याच्या महापालिका कार्य लयातील पाणी पुरवठा कार्यलयातील कार्यकारी अभियंता कक्षात तोडफोड केली आहे. कार्यालयातील खुर्च्यांची फेकफाक केली. आज सकाळी साडेअकरा वाजता सुमारास ठाकरे गटाने अकोला महापालिकेत हे आंदोलन केलं आहे.
पाणीपुरवठा अधिकारी कक्षात हजर नसल्याने चक्क ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील खुर्च्या तसेच इतर काही वस्तूंची तोडफोड अन् फेकाफेकी केली. त्याशिवाय महिलांनी देखील सोबत आणलेले घागर फोडले. अकोला शहरातील मलकापूर भागात मागील काही दिवसांपासून १० दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. अनेकांना पैसे मोजत पाणी विकत आणावे लागते. तर काही स्थानिक नागरिक वर्गणी करत पाण्याचा टँकर बोलवत आहेत. त्यामुळे मलकापूर भागात पाण्याची भीषण जाणवू लागली होती. याच विरोधात आज संतप्त मलकापूर नागरिकांसह ठाकरे गटाने आज अकोला महापालिका कार्यालयात घागर मोर्चा काढला होता.