सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारा महत्वाचा महामार्ग लातूर जिल्ह्याला जोडून नेण्याचा प्रयत्न करणार -केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी

गुजरातमधून निघणारा आणि बेंगलोर - चन्नईला जोडला जाणारा उत्तर- दक्षिण महामार्ग लातूर जिल्ह्यातून नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

S.n.ranjankar
  • Nov 26 2021 12:21PM
 गुजरातमधून निघणारा आणि बेंगलोर - चन्नईला जोडला जाणारा उत्तर- दक्षिण महामार्ग लातूर जिल्ह्यातून नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क ( टाऊन हॉल), महानगरपालिकेसमोर लातूर येथे आयोजित जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग लोकार्पण भूमीपूजन व समारंभात ते बोलत होते. यावेळी राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम), राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सुधाकर श्रृंगारे, उस्मानाबाद खासदार ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजे निबांळकर , आमदार विक्रम काळे, आमदार रमेश कराड, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार अभिमन्य पवार, माजी खासदार रुपाताई पाटील-निलंगेकर, माजी खासदार गोपाळराव पाटील, माजी आमदार विनायकराव पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्षा राहूल केंद्रे, रस्ते वाहतूक व मार्गचे श्री. सुरवसे,  मुख्य अभियंता संतोष शेलार आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते.  यावेळी मान्यवरांच्या हस्ते डिजीटल माध्यमातून रिमोटद्वारे 1) जाब-जळकोट-उदगीर-तोगरी राष्ट्रीय महामार्ग 50 वर काँक्रीट रस्त्याचे बांधकाम, एकूण लांबी 45 किमी. प्रकल्पाचे मुल्य 300 कोटी, 2) उमरगा ते औसा राष्ट्रीय महामार्ग 548 बी वर काँक्रीट रस्त्याचे बांधकाम एकूण लांबी 48 किमी, प्रकल्पाचे मूल्य 272 कोटी 3) लातूर छत्रपती चौक ते खारोळा पाटी राष्ट्रीय महामार्ग 548 बी आणि 361 एच वर काँक्रीट रस्त्याचे बांधकाम एकूण लांबी 28 किमी. प्रकल्पाचे मूल्य 238 कोटी 4) लातूर शहर महिला पॉलिटेक्निक ते गरुड चौक राष्ट्रीय महामार्ग क्र. 63 चे मजबुतीकरण    एकूण लांबी 9 किमी. प्रकल्पाचे मूल्य 14 कोटी 5) ढोकी (कोल्हेगाव) ते करकट्टा राष्ट्रीय महामार्ग क्र.63 चे मजबुतीकरण एकूण लांबी 18 किमी, प्रकल्पाचे मूल्य 11 कोटी 6) खरोला ते बामणी रार्ष्टीय महामार्ग क्र.63 चे मजबुतीकरण एकूण लांबी 6 किमी, प्रकल्पाचे मूल्य 9 कोटी 7) घरणी ते नळेगाव (आरीमोड) ते लातूर राष्ट्रीय महामार्ग क्र.752 चे मजबुतीकरण एकूण लांबी 18 किमी, प्रकल्पाचे मूल्य 7 कोटी 8) नळेगाव (आरीमोड) ते लातूर राष्ट्रीय महामार्ग क्र.752 चे मजबुतीकरण एकूण लांबी 10 किमी, प्रकल्पाचे मूल्य 6 कोटी या कामांचा लोकार्पण सोहळा व  1)गिराकचल गावाजवळ मांजरा नदीवर मोठया पूलाचे बांधकाम एकूण लांबी 380 मीटर्स, एकूण मूल्य 57 कोटी, 2) सेक्शन मुरुड अकोला- लातूर विमानतळ जंक्शन राष्ट्रीय महामार्ग क्र.63 चे चौपदरीकरण एूकण लांबी 6 किमी.प्रकल्पाचे मूल्य 30 कोटी, 3) खरोळा पाटी- खरोळा आणि बामणी-आष्टामोड राष्ट्रीय महामार्ग क्र.63 चे रुंदीकरण एकूण लांबी 8 किमी,प्रकल्पाचे मूल्य 21 कोटी, 4) अहमदपूर-थोडगा-मोघा ते जिल्हा सीमा या मार्गाची सुधारणा एकूण लांबी 13 किमी,प्रकल्पाचे मूल्य 20 कोटी, 5) गदवाड-शिराळा-बोरगाव (खु) मार्गाची सुधारणा एकूण लांबी 18 किमी,प्रकल्पाचे मूल्य 15 कोटी 6) औसा-नागरसोगा-दापेगाव या मार्गाची सुधारणा एकूण लांबी 35 किमी, प्रकल्पाचे मूल्य 5 कोटी 7) एमडीआर-9 ते बार्शी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग 63) ते ढाकणी मार्गाची सुधारणा एकूण लांबी  35 किमी,प्रकल्पाचे मूल्य 5 कोटी, 8)  औसा-यकतपूर-कान्हेरी-जयनगर मार्गाची सुधारणा एकूण लांबी 17 किमी,प्रकल्पाचे मूल्य 4 कोटी, 9) अहमदपूर ते तळेगावची सुधारणा एकूण लांबी 4 किमी, प्रकल्पाचे मूल्य 4 कोटी 10) निलंगा ते कासारशिरशी मार्गाची सुधारणा एकूण लांबी 7 किमी, प्रकल्पाचे मूल्य 3 कोटी 11) उदयगिरी महाविद्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, उदगीर शहर रस्ते दुभाजकाचे बांधकाम, विद्युतीकरण आणि सुधारणा एकूण लांबी 3 किमी, प्रकल्पाचे मूल्य 2 कोटी या कामांचा भूमीपूजन समारंभ संपन्न झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, लातूरची ओळख शैक्षणिक पंढरी म्हणून समजली जाते. लातूर पॅटर्नमध्ये आय.आय.टी., इंजिनिअरींगमध्ये लातूरच्या मुलां-मुलींचे वर्चस्व कायम राहिले आहे. शैक्षणिक क्षेत्रात येथील शाळा, महाविद्यालय, संस्था, उत्तम कागगिरी बजावत असतात. त्यामुळे लातूरचे नावलौकिक आहे. लातूर अन्य क्षेत्रातही पुढे जात आहे. लातूरचाच नव्हे, तर महाराष्ट्राचा विकास कसा करता येईल, याकडे माझे अधिक लक्ष आहे. रस्ते गावालाच, जोडणारे नसून ते माणसांच्या मनाला जोडणारे आहेत. त्यामुळे रस्ते अधिक उत्तम व चांगल्या प्रतीचे असणेही हेही बाब महत्वाची आहे. येत्या काळात रस्ते विकासासाठी भरघोस अशा निधीची तरतूद ठेवण्याचीही ग्वाही देऊन लातूर ते टेम्भूर्णी या मार्गाच्या चौपदरीकरणा बाबतही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी होकार दिला. केंद्रीय मंत्री श्री. गडकरी मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की, लातूर जिल्ह्यात सोयाबीन उत्पादनात अग्रेसर आहे. तर लातूरकरांनी आता सर्व प्रकारचे वाहने इथेनॉलवर चालणारी वापरावीत जेणेकरुन  पर्यावरण पुरक वातावरण राहील. तसेच लातूरमध्ये ब्रोडगेज मेट्रो सुरु करण्याबाबतही येथील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. यातून वेळ, तिकिट, विद्युतची बचत होणार आहे. रस्त्यांच्या विकासामुळे येथील युवकांना उद्योग, व्यापर, रोजगार करण्यास वाव मिळणार आहे. यातून शेतकरीही समृध्द होईल, असेही मत श्री. गडकरी यांनी व्यक्त केले.मागील काळात लातूरकरांना पाणीटंचाईमुळे रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला. त्यामुळे जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेवून गावातील पाणी गावातच, घरातील पाणी घरातच, शेतातील पाणी शेतातच मुरविण्यासाठी आपण सर्वांनी जनजागृती करावी, असे आवाहन केले. 
 राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था भक्कम करण्याचे काम रस्ते विकासाच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून होत आहे. जिल्ह्यातील संपूण रस्त्यांचे काम पूर्ण करत असून उर्वरित अपूर्ण रस्त्यांचेही काम पूर्णत्वास घेवून जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे माहिती देतांना राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले. तत्पुर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लातूर ते टेंभुर्णी या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचीही विनंती केली. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार