दिव्यांग प्रतिष्ठान तर्फे निगडीत "दिव्यांग सामुदायिक विवाह" सोहळा कार्यक्रम
प्रतिनिधि:दिपक चव्हाण पुणे
पुणे येथील दिव्यांग प्रतिष्ठानच्या माध्यमातून काल दिव्यांग सामुदायिक विवाह सोहळा पार पडला.या सोहळ्यात पाच दिव्यांग जोडप्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा म्हणून दिव्यांग सक्षमीकरणासाठी भविष्यात अर्थार्जन निर्मितीसाठी दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अर्थात डिकाईचे संस्थापक अध्यक्ष ध्यानमूर्ती आदरणीय श्री.रघुनाथ येमुल गुरुजी यांच्या विशेष प्रयत्नातून पिठाच्या गिरणी सप्रेम भेट देण्यात आली.
दिव्यांग प्रतिष्ठान तर्फे आयोजित दिव्यांग सामुदायिक विवाह सोहळा हा कार्यक्रम यमुनानगर,निगडी येथे पार पडला.या कार्यक्रमाला रघुनाथ येमुल गुरुजी यांनी वधु-वरांना भावी जीवनासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.
दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या माध्यमातून मागील दोन वर्षांपासून दिव्यांगांना सक्षम रोजगार उपलब्ध करून देण्याचा दिशेने यशस्वीपणे कार्य करत आहे.डीकाईचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ येमुल गुरुजी शुभेच्छा देताना म्हणाले की, "दिव्यांगांना व त्यांच्या कुटुंबियांना विवाह जुळवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.अशा व्यक्तींसाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे माध्यम निवडले त्याबद्दल दिव्यांग प्रतिष्ठानचे मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो.तसेच आम्ही डीकाई तर्फे दिव्यांग वधु-वरांना शुभेच्छा म्हणून पिठाची गिरणी सप्रेम भेट देत आहोत असे त्यांनी सांगितले.
डीकाईचे प्रवक्ते श्री.कुणाल वाघ म्हणाले, "डीकाईच्या अनेक महत्वाकांक्षी योजनेंचा पुण्यातील अनेक दिव्यांग बंधू-बघिणींना लाभ होणार आहे.आम्ही सातत्याने त्यासंदर्भात सरकारकडे पाठपुरावा करत आहोत". दिव्यांग प्रतिष्ठान तर्फे पाचही दिव्यांग वधु-वरांच्या विवाह सोहळा विधीयुक्त पद्धतीने पार पडला.
या कार्यक्रमात वधु-वरांना आशीर्वाद देण्यासाठी दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या कार्यकारी संचालिका राजश्रीताई गागरे आणि प्रवक्ते कुणाल वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.