ISRO Launch NVS-02: भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने नवा विक्रम केला आहे. इस्त्रोने आज सकाळी ६.२३ मिनिटांनी GSLV-F15 आकाशात प्रक्षेपित केले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून NVS-02 सॅटेलाइला घेऊन जाणारे GSLV-F15 यान लाँच केले आहे. GSLV-F15 मिशन यशस्वी झाल्यावर केंद्रिय मंत्री जितेंद्र सिंह यांनी इस्त्रोचे कौतुक केले आहे. देशातील अंतरिक्ष केंद्रातून हे १००वे प्रक्षेपण आहे. इस्त्रोचे हे मिशन यशस्वी झाले आहे.यामुळे इस्त्रोने अंतराळात नवीन उंची गाठली आहे. इस्त्रोची ही खूप मोठी कामगिरी आहे.
GSLV-F15 हे भारताच्या जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकलचे (GSLV) १७ वे मिशन होते. स्वदेशी क्रायो स्टेजसह ११ वे उड्डाण होते. स्वदेशी क्रायो स्टेजसह हे GSLV चे ८ वे ऑपरेशनल उड्डाण होते.
इस्त्रोने याबाबत आपल्या निवेदनात म्हटलंय की, GSLV-F15 NVS-02 सॅटेलाइला जियोसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये प्रस्थापित केले आहे. अनेक विद्यार्थ्यांना हे सॅटेलाइट लाँच होणार पाहायला मिळाले. १०० वे ऐतिहासिक उड्डाण करुन भारताने अंतराळातील कामगिरीत नवीन उंची गाठली आहे. हे एक खूप चांगले पाऊल आहे.