सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

रामेश्वरम येथे भक्तीपथ सेवा फाऊंडेशनच्या वतीने राबविले तिर्थक्षेत्र स्वच्छता अभियान

या अभियानात भक्तीपथ सेवा फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी व भविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

Sudarshan MH
  • Feb 9 2025 1:52PM

रामेश्वरम: भक्तीपथ सेवा फाऊंडेशनच्या वतीने तिर्थक्षेत्र रामेश्वरम येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानात भक्तीपथ सेवा फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी व भविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विशेष म्हणजे, पुणे, नाशिक मुंबई,हिंगोली,बारामती, सातारा, जालना,संभाजीनगर,येथील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी भक्तीभावाने तिर्थक्षेत्र रामेश्वरम येथील मंदिर परिसर व सुमुद्र किनारा येथील श्रमदान करून स्वच्छता अभियान राबविण्यात आला.

भक्तीपथ फाऊंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून देव, देश आणि धर्म यासाठी कार्यरत असून, देश-विदेशात सनातन धर्माचा प्रचार व संतांचे विचार पोहोचवणे, तसेच भक्ती सेवा आणि श्रमदानाच्या माध्यमातून समाजसेवा करणे हा त्यांच्या कार्याचा मुख्य उद्देश आहे.

या उपक्रमादरम्यान समुद्रकिनारा आणि परिसर स्वच्छ करण्यात आला, तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री शेषजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली  हा उपक्रम राबवण्यात येतात आशी माहिती भक्तीपथ सेवा फाऊंडेशन चे उपाध्यक्ष दिपक चव्हाण यांनी दिली.

उपक्रमादरम्यान फाऊंडेशनचे अध्यक्ष शेषजी महाराज व फाउंडेशन चे पदाधिकाऱ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आणि भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा संकल्प केला.ह्या वेळी रामेश्वरम देवस्थान व स्थानिक प्रशासन यानी ह्या उपक्रमाचे कौतुक केले असून,यावेळी भक्तीपथ फाऊंडेशन सर्व सदस्यांना शुभेच्छा  ही देण्यात आल्या.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार