सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भाजपाच्या विजयानंतर मौलाना सज्जाद नोमानीने 'व्होट जिहाद'बाबत केलेल्या वक्तव्याबद्दल मागितली बिनशर्त माफी

मौलाना सज्जाद नोमानीने विधानसभा निवडणुकीदरम्यान वादग्रस्त फतवा काढला होता. राज्यातील भाजपाला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांना इस्लामच्या कक्षेबाहेर फेकून दिले पाहिजे. तसेच त्यादरम्यान त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

Sudarshan MH
  • Nov 26 2024 10:59AM

मुंबई: आताच राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहे. या निवडणुकांमध्ये महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. महाराष्ट्रात भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मौलाना सज्जाद नोमानीने ‘व्होट जिहाद’बाबत केलेल्या वक्तव्याबद्दल बिनशर्त माफी मागितली आहे. कोणत्याही समाजाला दुखावण्याचा आपला हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मौलाना सज्जाद नोमानीने विधानसभा निवडणुकीदरम्यान वादग्रस्त फतवा काढला होता. राज्यातील भाजपाला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांना इस्लामच्या कक्षेबाहेर फेकून दिले पाहिजे. तसेच त्यादरम्यान त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्यांनी भाजपाला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांची खिल्ली उडवली आहे. तसेच ज्या मुसलमानांनी भाजपाला पाठिंबा दिला त्यांनी आपले नाव बदलून धनश्याम करा, असा टोला लगावला होता. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर नोमानी यांचे एक पत्र समोर आले आहे. ज्यामध्ये त्यांनी त्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत लोकांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवलेल्या लोकांसाठी ते वक्तव्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आपले शब्द त्या व्यक्तींसाठी आहेत, व्यापक मुस्लिम समाजासाठी नाहीत, असेही ते म्हणाले आहेत.

तसेच माझे हे विधान महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीचे आहे. माझा कोणत्याही समाजावर टिप्पणी करण्याचा हेतू नव्हता, तसेच आम्ही फतवाही काढला नव्हता, असे म्हणत नोमानी यांनी आपल्या पत्रात बिनशर्त माफी मागितली आहे. राज्यात महायुतीने २३५ जागा मिळवल्य़ाने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. एकट्या भाजपाने एकूण १३२ जागा जिंकल्या आहेत. निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचे लाडकी बहिण योजना, व्होट जिहाद आणि मराठा आरक्षण असे अनेक मुद्दे गाजले आहेत. सर्वात जास्त व्होट जिहादचा मुद्दा गाजला.

मौलाना सज्जाद नोमानीने भाजपाला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांची खिल्ली उडवली आणि स्वत:चे नाव धनश्याम ठेवण्याचा सल्ला दिला होता. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नोमानी यांनी बिनशर्त जाहीर माफी मागितली आहे. त्यांचा हेतू कोणत्याही विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्याचा किंवा फतवा काढण्याचा नव्हता, असे त्यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पत्रात नमूद केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार