सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिरगाव ग्रामपंचायतीनेच दिला बांगलादेशीला जन्म दाखला! मुंबई पोलिसांकडून धक्कादायक प्रकार उघडकीस

मुंबई पोलिसांना एका गुन्ह्यात बांगलादेशी आरोपी सापडला आणि त्याच्या चौकशीनंतर या प्रकरणाची पाळेमुळे रत्नागिरी तालुक्यातील मोठे उत्पन्न असलेल्या शिरगाव ग्रामपंचायतीपर्यंत येऊन पोहोचली आहेत.

Sudarshan MH
  • Jan 7 2025 12:01PM

रत्नागिरी: एका बांगलादेशी नागरिकाला पोलिसांनी मुंबई येथे एका गुन्ह्यात ताब्यात घेतल्यानंतर तो रत्नागिरीतील असल्याचे लक्षात आले. त्यानंतर ग्रामपंचायतीने खोटा दाखला दिल्याचे लक्षात आल्यानंतर मुंबई पोलिसांनी शिरगाव ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंचाला चौकशीसाठी मुंबईला बोल्यावल्याने रत्नागिरीत खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी एका गुन्ह्यातील बांगलादेशी नागरिकाला परकीय नागरिक अधिनियम 1946 या गुन्ह्यात आरोपी मोहम्मद इद्रीस मोहम्मद इशाक शेख उर्फ नसीम (42 वर्षे नाव जोशीमुद्दीन बिशू देवान हा मूळ बांगलादेशी) नागरिक याला ३ ऑक्टोबर २०२४ रोजी अटक केली होती.

शिरगांव ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, जन्मप्रमाणपत्र दिनांक 04/03/2020 रोजी बाळाचे नाव मोहम्मद ईद्रीस शेख (जन्म दिनांक 01/05/1983), जन्म ठिकाण (उद्यमनगर पडवेकर कॉलनी ता. जि. रत्नागिरी,), आई वडिलांचा कायमचा पत्ता ( उद्यमनगर पडवेकर कॉलनी ता. जि. रत्नागिरी) आईच नाव – शाहिदा बेगम मोहम्मद इसाक शेख, वडील मोहम्मद इसाक शेख असा खोटा जन्म दाखला 04/03/2020 रोजी बनवून देण्यास सहकार्य केल्याने शिरगाव ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच, ग्रामपंचायत ग्रामसेवक व ज्यांनी शिफारस दिली. याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य यांना चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी बोलावले आहे. त्यानुसार पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात येत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार