मुंबई: महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह यांनी ९ मार्च २०२५ रोजी दुबई येथे न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यानंतर पुरुष क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारताच्या विजयाचे स्मरण करण्यासाठी एक विशेष कैंसलेशन चे अनावरण केले आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत भारताच्या विजय साजरा करणारे हे विशेष कैंसलेशन टपाल तिकिट आज मुंबई जनरल पोस्ट ऑफिस (जीपीओ) येथे प्रकाशित करण्यात आले.
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात भारतीय क्रिकेट संघाने दाखवलेल्या राष्ट्रीय अभिमान आणि क्रीडा उत्कृष्टतेला विशेष महत्त्व आहे. हे कैंसलेशन संघाच्या कामगिरीचा आदर म्हणून करण्यात आले आहे आणि क्रिकेट उत्साही आणि तिकीट संग्राहक यांच्यासाठी एक संग्रहणीय वस्तू आहे.
हा प्रकाशन समारंभ मुंबई जीपीओ येथे आयोजित करण्यात आला होता. मुंबई क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल श्रीमती सुचिता जोशी, महाराष्ट्र सर्कलचे डाक सेवा निदेशक (मेल आणि व्यवसाय विकास) श्री मनोज कुमार आणि इतर मान्यवर, अधिकारी आणि क्रिकेट चाहते भारतीय क्रीडा क्षेत्रातील या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी जमले होते. महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल श्री. अमिताभ सिंह यांनी देशाच्या क्रीडा यशाची कायमची आठवण निर्माण करून, फिलाटेलिक वारशाच्या माध्यमातून या महत्त्वपूर्ण कामगिरीची दखल घेतल्याबद्दल अभिमान व्यक्त केला.