सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मोलगी तालुका निर्मितीसह वर्षानुवर्षे न सुटलेल्या विविध मागण्यांसाठी उपविभागीय अभियंता सा.बा. उपविभाग मोलगी यांच्या कार्यालयाच्या आवारात उपोषण सुरू.

उपविभाग मोलगी यांच्या कार्यालयाच्या आवारात उपोषण सुरू.

Sudarshan MH
  • Jun 12 2023 4:55PM
अक्कलकुवा प्रतिनिधी -योगेश्वर बुवा 
     मोलगी तालुका निर्मितीसह वर्षानुवर्षे न सुटलेल्या विविध मागण्यांसाठी उपविभागीय अभियंता सा.बा. उपविभाग मोलगी यांच्या कार्यालयाच्या आवारात उपोषण सुरू.
   दि. 8 जून ते दि. 12 जून व दि. 12 जून पासुन बेमुदत आमरण उपोषण सुरू.
      दोन राज्यपालांचे आश्वासन हवेतच विरले.
      उदय भारत सेवा समिती जिल्हा नंदुरबार तर्फे सातपुड्यातील तमाम नागरिकांच्या वतीने  रामसिंग दुधल्या वळवी रा. कंजाला ता. अक्कलकुवा यांनी बेमुदत उपोषण सुरू केले असताना परिसरातील विविध अनेक सामाजिक कार्यकर्ते त्याचा समवेत उपोषण करीत आहेत .दरम्यान भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा अनुसूचित जमाती मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी,, मा.जिल्हा परीषद सदस्य बाजुबाई वसावे , शिवसेना जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे , तसेच मांडवा येथील टेटा वळवी ,.प्रकाश सोलंकी यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषण कर्त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान अक्कलकुवा येथील तहसीलदार रामजी राठोड यांनी  उपोषण कर्ते रामसिंग वळवी यांच्या सोबत विविध मागण्यांबाबत  चर्चा केली.यावेळी  परिसरातील गमण, बामणी,चिमलखेडी,मुखडी,सिंदूरी,मणीबेली कंजाला,सांबर डेब्रामाळ,मांडवा इत्यादी गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते यांनी जाहीर पाठिंबा देत सदर उपोषणाचा ठिकाणी सहभाग नोंदविला आहेत.
       यावेळी अक्कलकुवा तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र मोलगी तालुका निर्मिती करणे, मोलगी तालुका होईपर्यंत सहाय्यक गट विकास अधिकारी व नायब तहसीलदार पद मंजूर करणे, मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन रक्तपेढी व सिकलसेल विभाग सुरू करणे, मोलगी परिसरातील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी मोलगी येथेच मुख्यालयी राहण्याची सक्ती करणे , मांडवा येथील अनुदानित आश्रम शाळा व गमन ,जामठी येथील शासकीय आश्रम शाळा स्थलांतर रद्द करून पूर्वीच्या ठिकाणी आश्रम शाळा भरवणे यासह अनेक प्रमुख मागण्या यावेळी करण्यात येत आहेत.
    अक्कलकुवा तालुका हा नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासीबहुल तालुका असून मोलगी हे अक्कलकुवा तालुक्यातील मोठे शहर असून गेल्या अनेक वर्षापासून मोलगी तालुका निर्मितीची प्रक्रिया व घोषणा सुरू असून देखील आजपर्यंत मोलगी तालुका निर्मिती झाली नसल्याची खंत या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे. मोलगी तालुका निर्मिती संदर्भात तत्कालिक राज्यपाल भगतसिंग कोशारी,  व विद्यासागर राव हे मोलगी व पिंपळखुटा  दौऱ्यावर आले असताना लवकरच मोलगी तालुका निर्मिती होईल असे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन अद्याप पर्यंत प्रत्यक्षात पुर्ण झाले नाही व  हवेतच विरले आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्याला अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री ॲड. के सी. पाडवी तसेच आताचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे लाभलेले असून देखील हा विषय मार्गी लागत नसल्याने मोलगी परिसरातील लोकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. अखेर मोलगी परिसरातील लोकांवर मोलगी तालुका निर्मिती करण्यासंदर्भात उपोषणाला बसण्याची दुर्दैवी वेळ आल्याचे म्हणावे लागेल. 
      तरी नंदुरबार जिल्ह्यातील आमदार, खासदार व मंत्री महोदय यांनी जातीने लक्ष देऊन त्वरित मोलगी तालुका निर्मितीसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे परिसरातील जनतेकडून बोलले जात आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार